आनंदी गोपाळ (चित्रपट) एक म्हण आपल्या समाजात रूढ झालेली आहे "प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एका स्त्री चा हात असतो" यात स्त्रीचा जरी उद्धार दिसत असला किंवा स्त्री जरी महत्वाची वाटत असली तरी या म्हणी मागे एका प्रकारची पितृसत्ताक मानसिकता आहे. म्हणजे स्त्री जाती ने फक्त यशस्वी पुरुष घडवायचेत आणि स्वतःला समाधानी मानून शांत बसायचं परंतु याच्याच उलट जर अशी म्हण निर्माण झाली की "प्रत्येक यशस्वी स्त्रीयांन मागे एका पुरुषाचा हात असतो" किंवा एका पुरुषाने जर एका स्त्री ला आपल्या पेक्षा जास्त ज्ञानी होण्यासाठी उठा ठेप केली समाजाशी भिडून गेला जाती धर्मा सोबत लढला आणि मला तुझ्या सारखी ज्ञानी जीवनसाथी मिळाली म्हणून मी धन्य झालो अस म्हटला तर ते पितृसत्तेच्या थोबाळीत मारण्या सारख होईल. तसेच आनंदी गोपाळ चित्रपटावर लिहीत असतांना चित्रपट निर्माता कोण आहे किंवा चित्रपटात गोपाळराव, आनंदीबाई यांची भूमिका कोणी साकारली हे लिहिण्याचा हेतू मुळीच नाही.       "आनंदी गोपाळ" हा चित्रपट भारताची पहिली महिला डॉक्टर " डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी" यांच्या जीवन चरित्रावर आधारित आहे. या पूर्वी आनंदीबाई किंवा गोपाळराव यांच्या बद्दल काही ही वाचलेलं नाही शिवाय आठवी किंवा नवव्या वर्गात शिकत असतांना अभ्यासक्रमात आनंदीबाई जोशी यांचा एक धडा वाचनात आला तेव्हा जी ओळख झाली ती आज पर्यंत. यातही एका यशस्वी स्त्री चा धडा आठवी किंवा नवव्या वर्गाच्या पाठ्यक्रमात येतो ही एक आश्चर्यांची बाब परंतु आनंदीबाई 'जोशी' यांचाच धडा येतो याच्या मागील जात वास्तव ही लक्षात घेण्याची गरज आहे. असो हा एक वादाचा, चर्चेचा आणि वेगळा मुद्धा आहे. आनंदीबाई जोशी ब्राम्हण कुटूंबात जन्मल्यामुळे कुटुंब धर्म, रूढी आणि परंपरा यांचं काटेकोर पालन करणार यात अजिबात शंका नाही, आनंदीबाई यांचा विवाह गोपाळराव यांच्या सोबत झाला परंतु गोपाळराव यांनी विवाह पूर्वी एक अट घातली ती मुलीला लग्ना नंतर शिकवण्याची. मला अस वाटत वर्तमान भूतकाळ आणि भविष्यकाळातील ही पहिली आणि शेवटची अशी घटना असावी या सोबतच भारतीय संस्कृतीत मुलगी पाहतांना प्रश्न विचारण्याची प्रथा होती जी आज पर्यंत आहे तशीच त्या प्रथेप्रमाणे गोपाळराव यांनी मुलीला प्रश्न विचारलेत त्यात एक प्रश्न होता लिहिता वाचता येत का? असा प्रश्न देखील विचारला ही घटना 1887 ची आहे ज्या वेळेस मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता मुली शिकल्या तर धर्म भ्रष्ट होईल अशी समजूत सर्वत्र समाजात पसरलेली होती मात्र त्या घटनेला 130 च्या वर वर्ष उलटून गेलीत सावित्रीमाई आणि ज्योतिराव फुलें नी त्या नंतर स्त्रीयांसाठी शिक्षणाची क्रांती केली, आंबेडकरांनी तसा कायदा बनवला आणि संविधानात महिलांन साठी विविध अधिकार मिळवून दिलेत मुलींना शिक्षण मिळू लागल मुली शिकू लागल्या तरी तश्या प्रकारची अट आणि तशा प्रकारचा प्रश्न क्वचितच कोणता पुरुष विचारत असेल आणी एखाद्या पुरुषाने विचारलाच तर तो आपल्या शिक्षणाशी जुळवून पाहण्यासाठी च विचारला जाईल. त्या उलट जर स्वतःहा मुलीची पुढे शिकण्याची ईच्या असली तर तिला शिकू दिल जात नाही. परंतु गोपाळराव यांनी तसा हट्ट केला आणि आनंदीबाई साठी यांच्या सारखा सरकारी नोकरदार असणार, निर्व्यसनी, चांगला मुलगा मिळणार नाही हे आनंदीबाई यांच्या वडिलांना कळून चुकलं होत म्हणून त्यांनी तात्पुरता शिकवण्याची अट मान्य केली आणि दोघांचा विवाह झाला. तिथून आनंदीबाई यांचा जो प्रवास सुरु झाला तो आनंदीबाई जोशी पासून तर डॉ. आनंदीबाई जोशी पर्यंत चा. आनंदीबाई यांनी शिकावं म्हणून गोपाळराव लग्नानंतर त्यांना बराच काळ त्यांच्या माहेरी सोडून जात असत प्राथमिक शिक्षणाची पुस्तक देऊन जात परंतु आनंदीबाई यांच्या आई पुस्तक जाळून टाकत आणि त्यांना एका लग्न झालेल्या स्त्री ने कस राहावं, कशी नवऱ्याची सेवा करावी, स्वयंपाक आणि इतर कामात व्यस्थ ठेवत, परंतु जेव्हा गोपाळराव यांना हे कळालं तेव्हा त्यांनी आनंदीबाई यांना टाकून जाण्याचा निर्णय घेतला. आपली जीवनसाथी शिकावी किंवा ती शिकत नाही म्हणून तिला टाकून जाण्याचा विचार करणारा कदाचित हा एकमेव पुरुष असावा नाहीतर भारतातील स्त्री- दास्यच, पितृसत्तेचं वास्तवा बद्दल आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाहीं.  असे अनेक प्रयत्न गोपाळरव यांनी त्यांना शिकवण्यासाठी केलेत आणि आनंदीबाई यांनी देखील त्यांच्या प्रयत्नांना साथ दिली,पहिल्यांदा घरी शिकवण्याचा प्रयत्न केला नंतर मिशनऱ्यांच्या शाळेत दाखल करून शिकवण्याचा प्रयत्न केला त्या दरम्यान धर्म मार्तंडाणी गोपाळराव आणि आनंदीबाई यांना खूप त्रास दिला शिवीगाळ केली,अश्लील शब्दांचा वापर केला, घरा समोर विष्टा,कचरा आणून टाकला, गोपाळरावांचा पहिला मुलगा कृष्णा याचे मुंडन करून झाडाला बांधून ठेवलं या त्रासाला कंटाळून त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याचा प्रयत्न केला परंतु तो आनंदीबाई यांनी नाकारला.यात विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे ती म्हणजे आनंदीबाई आणि गोपाळराव हे जोशी असतांना ब्राम्हण असतांना ( उच्चवर्णीय ) त्यांना समाजाने इतका त्रास दिला छळलं तर विचार करा धर्मशास्रा नुसार शूद्र अतिशूद्र (कनिष्ठ जातीतील) लोकांनसाठी शिक्षणाची काय अवस्था असेल याची कल्पनाच केलेली बरी. "आनंदी गोपाळ" हा चित्रपट पाहत असतांना अनेकांना या चित्रपटातून एक आशावाद निर्माण झाला असेल. ज्याने अस वाटत असेल की या चित्रपटातून पितृसत्तेच्या धर्म,रूढी,परंपरांच्या विरोधात एक पाऊल उचलेल आहे.पण मुळात आपल्या पत्नीने इंग्रजांच्या स्त्रीयां सारख सुटात-बुटात असावं,तिने इंग्रजी बोलावं किंवा आपली एक ओळख निर्माण व्हावी हाच एकमेव हेतू डोळ्यासमोर पाहायला मिळतो,आणि असा हेतू ठेवण ही चुकीचं नाहीच परंतु स्त्रीला गुलामीतून मुक्त करण्यासाठी हा प्रयत्न होता असा दावा या चित्रपटातून करणं मात्र चुकीचंच आहे.तसेच ही काही चित्रपटाची समीक्षा नाही फक्त त्या निमित्ताने स्त्री-पुरुष समानता,पितृसत्तेचा,जातीचा धर्माचा,रूढी, परंपरांच वास्तव उलगळण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे.सोबतच एक प्रश्न आपल्या समोर ठेऊन जात आहे की चित्रपटावर लिहीत असतांना किंवा विचार करत असतांना आनंदीबाई जोशी यांच्यावरच का चित्रपट बनतो? मुक्ता साळवे,ताराबाई शिंदे यांच्यावर का बनत नाही? यांच्या मागचं जात-वर्ग वास्तव लक्षात घेणे तितकंच गरजेचं आहे. तुषार पुष्पदिप सूर्यवंशी. एम. एस. डब्ल्यू महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा. suryawanshitush41@gmail.com

Comments

Popular posts from this blog

लोकतंत्र की लड़ाई में युवा वर्ग कहा हैं?