रक्षाबंधन. रक्षाबंधन मी मानीत नाही सर, कारण ती एक संस्कृती आहे म्हणून नाही, तर मी त्याच्या कडे वेगड्या दृष्टीने पाहतो .बहिणीची रक्षा करायला तिला स्वतःच्या भावा कडून राखी भाधून तिच्या सुरक्षिततेचे आश्वाशन घ्यावे लागेल का? म्हणजे भावाने तिची सुरक्षा करावी याचा अर्थ पुन्हा एक स्त्री म्हणून ती सक्षम नाही असं आपण म्हटलं तरी वावग ठरणार नाही, धाडसी काम असलं तर पुरुष आणि नाजूक काम असलं तर स्त्री असा समज आज जरी स्त्री सक्षम झाली असली तरी तसाच आहे, रक्षा बंधन ला तिच्या कडून राखी भाधायची आणि फक्त सुरक्षेचे आश्वासन करावं, दुसरं कोणतं का नाही? एक स्त्री म्हणून आपण तिला वागवतो पण माणूस म्हणून वागवतो का? अगदी आपल्या वया पासून सुरवात केली तरी चालेल या वयात आपण सर्व प्रेम करतो पण स्वतःच्या बहिणीचा विषय आल्यास आपण ते नाकारतो तेव्हा आपल्याला काळजी वाटते ती आपल्या अब्रूची, आपल्या जातीची, आपल्या परंपरांची, आणि मुख्य म्हणजे आपल्या संस्कृतीची तेव्हा आपल्याकडे धागे दोरे बांधतांना आपण आश्वासन करत नाही तिला प्रेम करण्याचा अधिकार देऊ अस,तिला तिच्या पसंतीचे कपडे घालण्याचा अधिकार देऊ, तिला वाटले तो पर्यँत शिक्षणाचा अधिकार देऊ, तिला नोकरी करण्याचा अधिकार देऊ, चळवळीत उतरण्याचा अधिकार देऊ, एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मी भाऊ म्हणून किंवा पुरुष म्हणून आपल्या संस्कृतीने दिला आहे का? स्त्रीला आणि देत आहोत का? आणि राहिला प्रश्न आपल्या तरुण पिढीला बोलण्याचा तर आपली काही तरुण पिढी ही बोलते पण आचरणात आणत नाही काही बोलतात पण स्पर्धेच्या अनुषंगाने ज्याचा संस्कृती आणि आचरणाशी काडीमात्र घेणेदेण नसतं.हे माझं स्वताःच वयक्तिक मत आहे कोणी लावून घेऊ नका.

Comments

Popular posts from this blog

लोकतंत्र की लड़ाई में युवा वर्ग कहा हैं?