यूपीच्या छपरा शाळेत एका 9 वर्षाच्या बालिकेवर शिक्षक, मुख्यधापक सहित 15 विद्यार्थी बलात्कार करतात तेव्हा. भारत महिला असुरक्षिततेत पहिल्या क्रमांकावर जेव्हा येतो तेंव्हा देशात होणाऱ्या महिलांवरच्या बलात्काराला कोणत्या एका अंगाने पाहुन भागत नाही पॉर्न व्हिडीओ पाहिल्याने बलात्काराचे प्रमाण वाढत आहे, मुली शॉर्ट घालतात त्यामुळे बलात्काराचे प्रमाण वाढत आहे, संस्कृती लोप पावल्यामुळे बलात्काराचे प्रमाण वाढत आहे अशा अनेक अंगाने पाहून बलात्कारचं विश्लेषण करता येईल का हा प्रश्न कायम आहे. नुकताच यूपी एका शिक्षणाच्या मंदिरात झालेल्या सामूहिक बलात्काराचा आपण विचार केला तर त्यात बलात्काराचा व्हिडीओ काढून ब्लॅकमेल केलं जातं आणि मुख्यध्यापक सहित 18 विध्यार्थ्यांन कढून बलात्कार केला जातो तेव्हा या घटनेत काही विचारवंत प्रवक्ते म्हणतात की "इतक्या दिवस बलात्कार करत असताना त्या बलिकेने घरी अथवा पोलीस ठाण्यात सांगण्याची हिम्मत का केली नाही" तर त्याचा अर्थ त्यांनी कोणत्या अंगाने लावला असेल ते त्यांना आणि त्यांच्या बुद्धिमत्तेला माहीत, परंतु बलात्काराकडे पाहतांना तो बलात्कार वासना क्षमवण्या साठी किंवा बदला घेण्यासाठी झाला असेल अस म्हटलं तर मूर्ख पणाच ठरत, कारण बलात्काराला जात, वर्ग, वर्ण, पितृसत्ताक आणि मग नंतर मानसशास्त्रीय दृष्टीने राग, द्वेष, वासना ही कारण कारणीभूत ठरतात. पितृसत्ताक संस्कृतीत स्त्री ला आधीपासूनच दुय्यम लेखण्यात आले आहे स्त्री ला उपभोगाची वस्तू समजण्यात आलेली आहे त्यामुळे बलात्कार वासनेच्या पलीकडे जाऊन होत असतो याच साधं उदाहर द्यायचं झाल्यास प्रियकर-प्रियसी किंवा पत्नी-पती यांच्यात संमतीने झालेला संभोग जो पर्यंत असतो तो पर्यँत तो बलात्कार नसतो परंतु प्रियसीची किंवा पत्नीची इच्छा नसते तेव्हा जबरदस्तीने केलेला संभोगाला आपण बलात्कार म्हणू शकतो यात शंका नाही यावर मी माज्या "पाच रुपायातही विकला जातो बलात्कार" या लेखात मी सविस्तर लिहिलं आहे. तुषार पुष्पा दिलीप सूर्यवंशी. suryawanshitushar41@gmail.com

Comments

Popular posts from this blog

लोकतंत्र की लड़ाई में युवा वर्ग कहा हैं?