#मातंग #महार #चांभार #दलित #बुद्ध, #तेली #माळी #कुणबी #मराठा #राजपूत मातंग समाजाच्या नवरदेवाने मंदिरात प्रवेश केल्यामुळे 24 मातंग कुटुंबांना सोडावं लागलं गाव. बाबा साहेबांच्या काळाराम मंदिराच्या प्रवेशा नंतर ही वस्तुस्थिती सर्व बुद्धिजीवीना विचार करायला लावण्याजोगी आहे जाती पाती संपल्या म्हणून पळ काढणारी माणसाची जात जाती टिकवण्यात नेहमीच पुढे असते. हे का ? झालं असं होतं राहणार आहे का ? अजूनही स्वतंत्र भारतात मंदिर प्रवेश, विहिरीत पोहोल्याने पाणी बाटने, कनिष्ठ जाती ने मुछ ठेवल्यास हत्या करणे असे प्रश्न उपस्थित असतील तर माणसाला माणूस म्हणून वागवलं जाणार आहे का ? माणसाचा इतर शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रगती कधी होणार आहे का ? का फक्त वरिष्ठ जातीतील लोकांनीच त्यातही काही वर्गातील लोकांनीच प्रगती करता येणार आहे, समाजात मुप्तपणे वावरता येणार आहे ? इथल्या राजकीय पक्षांना या सर्व गोष्टींकडे पाहणे महत्वाचे वाटते की नाही का यांना जाती धर्म अजून घट्ट करायच्या आहेत आणि त्यावर राजकारण करायचं आहे ? या सर्व गोष्टींचा विचार जातीअंत, वर्गजातीअंत, मानवमुक्तीचा लढा लढणाऱ्या सामाजिक, राजकीय संघटनांनी पक्षानी विचार करणं खूप महत्वाचे आहे नुसतच मी माझी संघटना माझा पक्ष माझी विचारधारा यावर बोंबलत न बसता एक मोठा सामाजिक, सांस्कृतिक, आणि महत्वाचा राजकीय लढा उभारला पाहिजे नाहीतर प्रतिगामी शक्ती एक दिवस हुकूमशाही लादण्यास, संविधान संपवून एक जातीवर धर्मावर आधारित संविधान जी आपल्या सर्वांना माहिती आहे ती तयार करण्यास यशस्वी होणार आहे. तुषार पुष्पा दिलीप सुर्यवंशी. suryawanshitushar41@gmail.com

Comments

Popular posts from this blog

लोकतंत्र की लड़ाई में युवा वर्ग कहा हैं?