अशी जाहली यांची दोस्ती जिला कोण्या एका दिवसाची गरज नाही. मैत्री दिनाचा तो दिवस होता सकाळच्या सुमारास रस्त्यांना चालतांना अचानक ते माझ्या नजरेस पडले, दिवस असा सुंदर उजाडला होता जणू काही नुकताच पाऊस पडून गेला आणि हळुवार सूर्याची किरण ते पावसाचे थेंब चिरत उजाळमान होत होते, नदीच्या किनाऱ्यावर भेधुंद हवा, आपलं भान विसरून पाण्याला छेडून जात होती, आणि त्या पाण्याचा स्पर्श होताच एखाद्याने विण्याचे तार छेडावे असा भास होताच मी भावनेवर आलो. आणि पुन्हा एकदा त्यांच्याकडे बगू लागलो.वय वर्ष 3,अगदी नुकतीच जन्माला आलेली जिला या स्वार्थी जगाची अजून ओळख नाही, जिला माणूस माहीत नाही, जिला गरिबी श्रीमंती यातला भेद माहीत नाही, बस ती रस्त्याने एकठी चालत होती. माहीत नाही कोणाला शोधत होती जणू काही स्वतःच अस्तित्व शोधत असावी, कधी मंदिरात, कधी नदीच्या काठी तर कधी समुद्राच्या वाहणाऱ्या बेधुंद लहरांना ती विचारत असावि. सांगाना या जगात कुठे आहे माझं अस्तित्व, कुठे हरवलंय माझं बालपण, कोण आहे या जगात माझं असे एकना अनेक प्रश्न ती त्यानां विचारत होती. तितक्यात तिला तिच्या बरोबरीचा जणू काही त्याला तीच बोलणं कळलं असावं, जणू तीच अस्तित्व तीच बालपण त्याच्या कडेच असावं,वय वर्ष 60 अंगावर फाटलेले कपडे , पाठीवर झोळी, मनात माणुसकी असलेला, काळकुठं अंग, जाडी भद्री दाढी, त्यानं तिला जवळ घेतलं आमजल कोमजल सांगितलं घाबरू नको या जगात तुज कोणी नसलं म्हणून काय झालं, मी आहे ना आज पासून आपण दोग मित्र आहोत. त्या वेळेस मला मैत्रीची किंमत कळाली अशी मैत्री जिला दोऱ्या धाग्याची गरज नाही, जिला कोणतीही वयाची अट नाही, जिला तुटण्याची भीती नाही.हे सर्व पाहताच मला रडू कोसळल आणि त्यांच्या मैत्रीवर एक ओळ मला सुचली. अशी जाहली यांची दोस्ती जिला कोण्या एका दिवसाची गरज नाही. तुषार पुष्पा दिलीप सूर्यवंशी. ( तू & ति ) suryawanshitushar41@gmail.com

Comments

Popular posts from this blog

लोकतंत्र की लड़ाई में युवा वर्ग कहा हैं?