स्त्री खरच शिकली का ? आज अनेक ठिकाणी स्त्री पुरुष समानतेच्या बाजार गप्पा मारल्या जातात मात्र त्या गप्पांमधून एकही स्त्री स्वतंत्र होऊन बाहेर येत नाही त्यावर कवी शेषराव धांडे म्हणतात- ते &स्वातंत्र्या&वर धुवाधार चर्चा करत होते, स्वतःच्याच बायकोला मात्र प्रतिष्ठेच्या नावाखाली- गुलामीची वागणूक देत होते. आणि याच स्वातंत्र्याचा भाग म्हणजे शिक्षण स्वातंत्र्य स्त्री शिक्षण स्वातंत्र्य मुळात स्त्री शिक्षणाचा विचार केला तर आज स्त्री खरच शिकली का ? का ? तिला शिकू दिल नाही, का ? तिच्या पर्यँत शिक्षण पोहोचलं नाही असे प्रश्न डोळ्या समोर येतात आणि कोणीतरी पितृसत्ताक विचारधारेचा शहाणा उभा राहतो आणि म्हणतो कोण म्हटलं स्त्री शिकली नाही आज अस एकही क्षेत्र नाही सामाजिक, राजकीय, शिक्षण जेथे महिला आघाडीवर नाही. दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्या नंतरही वृत्तपत्रांमध्ये भरभरून वृत्त येतात की यंदाही आघाडीवर मुलीच. यानुसार स्त्री शिकली अस वाटत असेल तर तो आपला भाबळा आशावाद आहे कारण विद्दे विना माती गेली | मति विना नीती गेली नीती विना गती गेली | गती विना वित्त गेले वित्त विना शूद्र खचले | इतके अनर्थ एका अविद्धेने केले. ह्या सिध्दांत्यांची मांडणी जरी महात्मा फुलेंनी त्यांच्या काळाची परिस्थिती लक्षात घेऊन केली असली तरी ती आज तंतोतंत तशीच वर्तमानात लागू होते कारण जोतीरावाना कळून चुकले होते की समाजातील लोकांत मति, नीती, गती, आणि वित्त दूर करायचे असेल तर इथला समाज जो अशिक्षित आहे तो शिक्षत झाला पाहिजे नाहीतर कुठल्याही देशाला अधोगतीच्या दिशेने न्यायच असेल तर त्या देशातल्या लोकांना आधी निरक्षर करावं लागतं आणि तेथील लोक निरक्षर झाली म्हणजे देश अधोगतीच्या दिशेने जातो यात कुठलीही शंका नाही आणि अगदी तसाच काहीसा प्रयत्न 1300 सरकारी शाळा बंद करून इथली व्यवस्था करत आहे. मुळात आजची शिक्षण पद्धती इतकी तकलादू झाली आहे की ती खऱ्या अर्थाने माणूस घडवण्याचं काम करत नाही आहे ती &रोबो मॅन&तयार करत आहे जो फक्त माणसाचा पुतळा असेल ज्यात भावना नसतील, समाज प्रति जाणीव नसेल म्हणजे काल पर्यँत अशिक्षित स्त्री गुलाम होती आज मात्र ती शिक्षण घेऊन गुलाम आहे शिक्षण म्हणजे काय यावर फुले म्हणतात &शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेईल तो गुरगुरेल&याही पुढे जाऊन जोतीराव म्हणतात आतातरी तुम्ही मागे घेऊ नका | धि:कारूनी टाका मनुमत विद्दा शिकताच पावालं ते सुख | घ्यावा माझा लेख जोती म्हणे. जोतिरावांनी खऱ्या अर्थाने 1 जानेवारी 1848 ला पुण्याच्या भीळेवाड्यात पहिल्यांदा या व्यवस्थेच्या विरोधात शंख फुकला आणि तो शंख सांगू लागला त्या व्यवस्थेला की तुमि भांदलेल्या अज्ञानाच्या बेड्या आता स्रिया तोडणार आहे, आणि तुमच्या छातडावर थया थया नाचणार आहे आणि जोतिरावांनी केलेल्या क्रांतीमुळे &मुक्ता साळवे&ह्या मातंग समाजातील विद्यार्थिनींने सॅन १८५५ मध्ये धर्मा विशद बंडखोर निबंध लिहिला, याच क्रांती मूळे &ताराबाई शिंदे&सारखी महिला १८६२ मध्ये &स्त्री-पुरुष तुलना&हे पुस्तक लिहून जगातील पहिली स्त्रीवादी लेखिका निर्माण झाळू, यांचं क्रांतीने तानुबाई बिर्जे ही जगातील पहिली वृत्तपत्र संपादिका होऊ शकली, क्रांती झाली खरी परंतु स्त्री खरच शिकली का हा प्रश्न कायम राहिला कारण काल पर्यँत ती अशिक्षित राहून चूल आणि मूल सांभाळत होती आज मात्र ती शिकून चूल आणि मूल सांभाळत आहे. मुळातच शिक्षण ही एक सामाजिक-सांस्कृतिक प्रक्रिया आहे जिच्यामुळे समस्त मानवजात सर्जनशील बनत जाते समाजात न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, व्यक्तीचा आत्मसन्मान, सांस्कृतिक विविधता, सामाजिक संवाद, शांतता ही सर्व मूल्य रुजवायची असतील तर तो समाज शिक्षित होणं तितकंच महत्वाचं असत आणि गुणवत्ता धारक माणूसपण जगवणार शिक्षण जर खऱ्या अर्थाने दिल गेलं तर सार्वभौम, धर्मनिरपेक्ष व लोकशाहीवादी मूल्य रुजू होऊन उदारमतवादी नागरिकत्व असणाऱ्या भारताची निर्मिती होईल. 2012 चे चेन्नई घोषणपत्रात नमूद केल्या प्रमाणे आपल्या राज्यघटनेनेचं असहिष्णू, जातीयवाद, फेसिस्ट प्रवृत्ती तसेच विशिष्ठ वंश, जातधर्म, लिंग संस्कृती, भाषा यांच्या आधारे केले जाणारे वर्चस्वाचे प्रदर्शन, सक्षम व्यक्तीकडून शारीरिक-अपंग, दुर्बल व्यक्तीवर गाजविले जाणारे वर्चस्व याला विरोध करणाऱ्या निकोप शिक्षण पद्धतीचा पुरस्कार केला आहे. इतकेच नव्हे तर शाहू महाराज यांनी प्रत्यक्षात शिक्षण कृती केली आणि त्यांच्या काळात शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन एक फतवा काढला की जो कोणी आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाही त्यांना (1) रुपया दंड आकारण्यात येईल. यांच्याही पुढे जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा सांगितलं, गाडगे महाराज याला अपवाद ठरले नाहीत त्यांनी आपल्या प्रबोधनपर कीर्तनात सांगितलं &लेकाहो एक साडी लुगडं कमी घ्या एकाच वेळेचं जेवा पण तुमच्या पोरायले शिक्षण ध्या. आणि तेच कर्मवीर भाऊराव पाटील ज्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन करून मांगा महाराच्या पोरांना शिकवायच काम केलं ते शिक्षणाच्या पालिकळे जाऊन गुणवत्तेवर भाष्य करतात ते म्हणतात गुणवत्ता म्हणजे तुमच्या गुणपत्रिकेला आणली गुणांची सूज नवे तर गुणवत्ता म्हणजे शाळेत शिकवल्या नंतर तुमच्या टाळक्यात जे उरत ना ती म्हणजे गुणवत्ता&मात्र आज परिस्थिती वेगळी आहे आज महिला सरपंच असते मात्र तीच संपूर्ण काम तिचा नवरा पाहत असतो, आज मुलीला का शिकवलं जातं तर तिला चांगला शिक्षित मुलगा मिडावा म्हणून किंवा मुलाला चांगली मुलगी मिडावी म्हणून एकंदरीत आज स्त्री खऱ्या अर्थानं शिकली का ? हा प्रश्न कायम असणार आहे आणि तो बदलेल असा भाबळा सकारात्मक आशावाद ठेवावा लागेल. Tushar suryawanshi suryawanshitushar41@gmail.com

Comments

Popular posts from this blog

लोकतंत्र की लड़ाई में युवा वर्ग कहा हैं?