Posts

Showing posts from March, 2018
रक्षाबंधन. रक्षाबंधन मी मानीत नाही सर, कारण ती एक संस्कृती आहे म्हणून नाही, तर मी त्याच्या कडे वेगड्या दृष्टीने पाहतो .बहिणीची रक्षा करायला तिला स्वतःच्या भावा कडून राखी भाधून तिच्या सुरक्षिततेचे आश्वाशन घ्यावे लागेल का? म्हणजे भावाने तिची सुरक्षा करावी याचा अर्थ पुन्हा एक स्त्री म्हणून ती सक्षम नाही असं आपण म्हटलं तरी वावग ठरणार नाही, धाडसी काम असलं तर पुरुष आणि नाजूक काम असलं तर स्त्री असा समज आज जरी स्त्री सक्षम झाली असली तरी तसाच आहे, रक्षा बंधन ला तिच्या कडून राखी भाधायची आणि फक्त सुरक्षेचे आश्वासन करावं, दुसरं कोणतं का नाही? एक स्त्री म्हणून आपण तिला वागवतो पण माणूस म्हणून वागवतो का? अगदी आपल्या वया पासून सुरवात केली तरी चालेल या वयात आपण सर्व प्रेम करतो पण स्वतःच्या बहिणीचा विषय आल्यास आपण ते नाकारतो तेव्हा आपल्याला काळजी वाटते ती आपल्या अब्रूची, आपल्या जातीची, आपल्या परंपरांची, आणि मुख्य म्हणजे आपल्या संस्कृतीची तेव्हा आपल्याकडे धागे दोरे बांधतांना आपण आश्वासन करत नाही तिला प्रेम करण्याचा अधिकार देऊ अस,तिला तिच्या पसंतीचे कपडे घालण्याचा अधिकार देऊ, तिला वाटले तो पर्यँ
प्रिय गरिबी. आज तू मला तुझ्यावर लिहिण्यास मजबूर केल परंतु तुझ्यावर लिहीत असताना दोन प्रश्न मला पडलेत, एक म्हणजे तुला प्रिय तरी का? म्हणाव, आणि दुसरं म्हणजे तुझ्यावर लिहिल्या नंतर तुझ्या पर्यंत हे लिखाण कस कुठे आणि केव्हा पोहचवाव, कारण तू कधी कुठे आणि कशी भेटशील याची खात्री नाही. तशी तू नेहमी असतेच एक वेळ जेवणाऱ्याजवळ, झोपडीत, रस्त्यावर झोपणाऱ्या जवळ, खूप असून उपाशी असणाऱ्या जवळ, तू दिसतेही मला दररोज गाडीत भीक मांगताना, पोटासाठी भर उन्हात राबत्तांना, बैल नाही म्हणून स्वतःला नांगराला जुपतांना, शिक्षणासाठी उपाशी राहून काम करतांना, पैशा साठी देह विकत्तांना, पैसे नाहीत म्हणून देह कापतांना, कधी एका वेळेच्या भाकरीत, तर कधी पोट भराव म्हणून पिणाऱ्या पाणीत अशा अनेक ठिकाणी मी तुला पाहिलं अनुभवलं परंतु तुला कधीच कोणती तक्रार केली नाही परंतु आज मात्र मला असहाय्य झालं. सांग ना जन्माला आलो तेव्हा तूच भेटली, आणि तेव्हा पासून अजूनही मला सोडायला तयार नाही, अजून किती तुला सहन करायच, अजून किती रात्र उपाशी झोपायचं, तिने दिलेले पैशे नेहमी शिक्षणालाच लागतात मग ती विचारते जेवलास का तेव्हा ईच
Image
फेसबुक चाळत असतांना "ADWAIT " यांच्या ब्लॉगवर जाऊन केविन कार्टरया जगप्रसिद्ध छायाचित्रकाराने काढलेल्या चित्रा बद्दल वाचले आणि मन सुन्न झाले त्या बद्दल काही त्यांच्याच ब्लॉगवरतून. केविनचा जन्म साउथ आफ्रिका मधील जोहान्सबर्ग येथे १९६० साली झाला. फोटोग्राफीला सुरुवात केल्यानंतर केविनने लवकरच ‘the bang bang club’ला जॉईन केले. मुख्यतः साउथ आफ्रिकेतल्या शहरांमध्ये कृष्णवर्णीय लोकांवर होणाऱ्या अत्याचाराचे, अन्यायाचे फोटो काढणाऱ्यांना ‘bang bang club’ या नावाने ओळखले जाई. हिंसाचार, खून, दंगलीचे फोटो काढणे हा केविनच्या कामाचा भागच होता. अनेकदा यासगळ्या त्रासापासून स्वतःला तोडून ठेवण्यासाठी तो ड्रग्जचा सहारा घेत असे. याच ‘the bang bang club’ या अंतर्गत १९९३साली सुदान येथे पडलेल्या भयंकर अश्या दुष्काळाची बातमी कव्हर करण्यासठी गेला. तिथे आयोड या एका छोट्याश्या गावात असलेल्या एका खाद्य पुरवठा केंद्राच्या काही अंतरावर त्याने हे चित्र काढले. या चित्रात दिसत असलेले छोटसे बाळ खरतर मुलगा आहे मात्र सुरुवातील हे छायाचित्र प्रकाशीत झाले तेव्हा मात्र ती मुलगी असल्याचे अनेकांचे मत झाले आ
अशी जाहली यांची दोस्ती जिला कोण्या एका दिवसाची गरज नाही. मैत्री दिनाचा तो दिवस होता सकाळच्या सुमारास रस्त्यांना चालतांना अचानक ते माझ्या नजरेस पडले, दिवस असा सुंदर उजाडला होता जणू काही नुकताच पाऊस पडून गेला आणि हळुवार सूर्याची किरण ते पावसाचे थेंब चिरत उजाळमान होत होते, नदीच्या किनाऱ्यावर भेधुंद हवा, आपलं भान विसरून पाण्याला छेडून जात होती, आणि त्या पाण्याचा स्पर्श होताच एखाद्याने विण्याचे तार छेडावे असा भास होताच मी भावनेवर आलो. आणि पुन्हा एकदा त्यांच्याकडे बगू लागलो.वय वर्ष 3,अगदी नुकतीच जन्माला आलेली जिला या स्वार्थी जगाची अजून ओळख नाही, जिला माणूस माहीत नाही, जिला गरिबी श्रीमंती यातला भेद माहीत नाही, बस ती रस्त्याने एकठी चालत होती. माहीत नाही कोणाला शोधत होती जणू काही स्वतःच अस्तित्व शोधत असावी, कधी मंदिरात, कधी नदीच्या काठी तर कधी समुद्राच्या वाहणाऱ्या बेधुंद लहरांना ती विचारत असावि. सांगाना या जगात कुठे आहे माझं अस्तित्व, कुठे हरवलंय माझं बालपण, कोण आहे या जगात माझं असे एकना अनेक प्रश्न ती त्यानां विचारत होती. तितक्यात तिला तिच्या बरोबरीचा जणू काही त्याला तीच बोलणं कळलं अ
स्त्री खरच शिकली का ? आज अनेक ठिकाणी स्त्री पुरुष समानतेच्या बाजार गप्पा मारल्या जातात मात्र त्या गप्पांमधून एकही स्त्री स्वतंत्र होऊन बाहेर येत नाही त्यावर कवी शेषराव धांडे म्हणतात- ते &स्वातंत्र्या&वर धुवाधार चर्चा करत होते, स्वतःच्याच बायकोला मात्र प्रतिष्ठेच्या नावाखाली- गुलामीची वागणूक देत होते. आणि याच स्वातंत्र्याचा भाग म्हणजे शिक्षण स्वातंत्र्य स्त्री शिक्षण स्वातंत्र्य मुळात स्त्री शिक्षणाचा विचार केला तर आज स्त्री खरच शिकली का ? का ? तिला शिकू दिल नाही, का ? तिच्या पर्यँत शिक्षण पोहोचलं नाही असे प्रश्न डोळ्या समोर येतात आणि कोणीतरी पितृसत्ताक विचारधारेचा शहाणा उभा राहतो आणि म्हणतो कोण म्हटलं स्त्री शिकली नाही आज अस एकही क्षेत्र नाही सामाजिक, राजकीय, शिक्षण जेथे महिला आघाडीवर नाही. दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्या नंतरही वृत्तपत्रांमध्ये भरभरून वृत्त येतात की यंदाही आघाडीवर मुलीच. यानुसार स्त्री शिकली अस वाटत असेल तर तो आपला भाबळा आशावाद आहे कारण विद्दे विना माती गेली | मति विना नीती गेली नीती विना गती गेली | गती विना वित्त ग
जब देखा मेने खुदसे बाहर झुक्कर तो सब तरफ गाफील था, . बस मे निकल पडा. गाफील