दि. 25 फेब्रुवारी 2018 रोजी आमचे मित्र धीरज यांच्या फेसबुक वॉलवर एक पोस्ट वाचली आणि मन सुन्न झाल.
पोस्ट अशी होती- केरळ च्या पलक्कड जिल्यातील आदिवासी भागातील 27 वर्षीय मधू कडूकुमन्ना नावाचा एका व्यक्तीने कित्तेक दिवसापासून भुकेला, त्याच्यावर 100 ते 200 रुपयांचा तांदूळ चोरीचा आरोप लावून त्याला लोकांनी दगड काडीने ठेचून मारून टाकला.
वास्तवात यात वाईट वाटण्याजोग, दुःख होण्याजोग आणि मन सुन्न होण्याजोग काहीच नाही कारण असा भुकेन व्याकुळ होऊन चोरीचा आरोप लावून हत्या होणारा मधू हा काही पहिला किंवा एकटा नाही असे लाखो करोडो मधु आपल्याला रोज रेल्वे स्टेशन, बस स्थानक, मार्केट, गावात - शहरात पाहायला भेटतात, आणि थोडा इतिहासाचा आढावा घेतला तर तेव्हापासून ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते फक्त फ़रक इतकाच आहे की पूर्वी तो कायदा होता हत्या करण्याचा गुलामीत मरण्याचा आज त्याला एक प्रोफेशनल नाव आहे भिकारी, चोर.
                    मात्र ती गुलामी ती गरिबी आज तागायत तशीच जिवंत आहे भारतात मन की बात सुरू असताना, भारत डिजिटल होत असताना, बुलेट ट्रेन सारखी सुविधा उपलब्ध होत असताना, भारतातील गरिबी संपत असतांना, कोणीही बेरोजगार नसून सर्वांना रोजगार मिळत असतांना आणि विदेशात भारत रोज नावाजत असताना एकंदरीत एक नवीन सुजलाम, सुफलाम भारत उभा राहत आहे तरीही आज भिकारी आहेत जे रस्त्यावर भीक मागत नाहीत मात्र भिकारी सारख जीवन जगत आहेत, आजही मोठं मोठ्या संस्था उपलब्ध असतांना ज्याच्यावर कधी संशोधन झालं नाही असा अस्थित्वहीन देव असतांना आणि भरताकडे 650 ते 700 लाख टन अन्न धान्य उपलब्ध असतांना एका वेळेचं जेवण न करता कधी एका रात्रीसाठी तर कधी कायमचा झोपणारा एक वर्ग आहे, शिक्षण घेऊनही समाजाच्या कामी न येणार एक अशिक्षित वर्ग आहे आणि ज्याच्या वाटेल शिक्षणच आलं आहे अर्थात येऊ दिल नाही असा एक वर्ग आहे, सकाळी उठल्यावर नास्था चहा करून एशो आरामात जीवन जगणार एक वर्ग आहे आणि सकाळच्या पाहरी कचरा वेचणारा एक वर्ग आहे, दोघ टाईम जेवण करणारा एक वर्ग आहे आणि एक टायमाच जेवण मिळावं म्हणून लोकांच्या घरोघरी जाऊन भांडी धून करणारा एक वर्ग आहे, आमवश्या ला खूप सार बनवून पितृ घालणारा एक वर्ग आहे आणि आपल्या लेकरा बाळा साठी आमवश्या मागणारा एक वर्ग आहे, खूप सारे फटाके, फराळ, लाळु, मिठाईची दिवाळी, आखाजी, साजरा करणारा एक वर्ग आहे आणि फुटलेल्या फटाक्यांवर खेळणारा, मागून दिवाळी साजरी करणारा एक वर्ग आहे, कोणी मृत पावल्यास लाखो रुपये खर्च करून अंतिम संस्कार करणारा एक वर्ग आहे आणि मुलाच्या देहाला अग्निसाठी पैसे नसल्यामुळे तो मृतदेह दान करावा लागणारा एक वर्ग आहे.
असे वर्गभेद का आहेत ? या ठिकाणी मार्क्स ने मांडलेला वर्गभेद खरा उतरतो. का कॉ. शरद पाटलांचा जातीवर आधारित समाज कारणीभूत आहे ? का पिड्यांपासून होत आलेला अन्याय- अत्याचार कारणीभूत आहे ? का शिक्षणापासून वंचित ठेवल्यामुळे ही गरिबी दारिद्री त्यांना सहन करावी लागत आहे ? नक्की कोणती कारण आहेत या व्यवस्थेला हा प्रश्न मधू सारख्या असंख्य हत्या झाल्या नंतर आम्हाला का पडत नाही. आणि पडलाच तर त्याचा आपल्याला काय घेणं देणं म्हणून आपण त्या घटनेला टाळत असतो ती मधू ची पोस्ट पुढे पाठवण्या पूर्वी मला पूर्ण कल्पना होती की त्यावर काही अशी मत लोकांची पडतील-
त्याने चोरी का करावी काम धंदा करून पोट नाही का भारत येत.
त्याला लोकांनी का माराव पोलिसांच्या हातात द्यायला पाहिजे होत.
तुम्ही ज्या सरकारला व्यवस्थेला बोलता आहात ती कशी कारणीभूत असू शकते.

        ही नकारात्मक मत येतीलच परंतु सकारात्मक मत देखील पडलीत मात्र नुसत्या सकारात्मक मतांनी किंवा हे सर्व लिहून ती परिस्थिती बदलत असेल तर तो आपला भाबळा आशावाद आहे.

तुषार पुष्पा दिलीप सूर्यवंशी.
(तू & ती)
http://chetushar.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

लोकतंत्र की लड़ाई में युवा वर्ग कहा हैं?