प्रिय आबासाहेब.

बाप नसलेल्या मुलांच father's day ला आपल्या बापाला पत्र.

प्रिय आबासाहेब,

        तुमच्यावर लिहाव म्हटलं पन ते जमत नाही कारण तुम्ही आम्हाला कधी वेळ दिलाच नाही तुम्ही फक्त तुमच्या दारुतच मग्न असायचे कधी आमचा अभ्यास घेतला नाही, कधी आम्हाला कुठे फिरायला नाही घेऊन गेलात, आम्ही काय करतोय कसे करतोय चांगल करतोय की वाईट कधीच पाहिल नाही,
      परंतु आज सर्विकळे 'fathers day' साजरा केला जातो आहे माझे सर्व मित्र त्यांच्या वडिलांन सोबत फोटो टाकत आहेत परंतु मला तुमच्या सोबत टाकायला फोटोसुद्धा नाही. का? तुम्ही busy होता, का ? तुमच आमच्यावर प्रेम नवत, सांगाणा कुठल कारण मि गृहीत पकडायच माझी आई सांगते की तुमच्या आबासाहेबाना #लिहिन्याची, #वाचनाची, #बोलण्याची आवड़ होती तुम्ही चांगले #नाटककार ही होतात, तुम्ही 'स्वंसार' नाटकात महिलेच ''चंचला'' नावाच पात्र करायचे तुमच्या काळात ते स्वंसार नावाच नाटक खूप गाजवल तुम्ही मग प्रत्यक्षात तुमचा स्वंसार का तुम्ही सुखाने आनदानी नाही गाजवला. तुमच शिक्षनही चांगल होत (डी. ऐड. बी. ऐड.) मग काय अस घड़ल की तुम्ही तुमचा आवडता ज्याला तुम्ही खूप प्रेम करायचे रात्रि दारू पिऊन खुप उशिरा यायचे परंतु माझ्या साठी माझी आवडती #कचोरी आणि #इमारती घेऊन यायचेत आणि रात्रि कितीही वेळ झाला तरी मला उठउन खाऊ घालायचे मुळात मीच झोपायचो नाही तुमची वाट पाहात असायचो. परंतु आबासाहेब आज मला कोन कचोरी इमारती आणून देईल त्या नंतर मि आज पर्यंत कधी इमारतीला तोड़ लावला असेल तर शपत तुमची, तुमची वाट पाहता पाहता तुम्ही मला कायमचीच वाट पाहायला लावली कदिच नंतर परत माझ्या साठी माझा आवडता पदार्थ घेऊन आला नाहीत. माझ्यावर रागवला होतात का? माझ काहि चुकल होत का?  का? तुम्ही माझ्या आईला विधवा करुण टाकल, का? तुम्ही आम्हा तिघ भावंडाच्या डोक्यावरतुंन बापाच छत्र हिरउन घेतल तुम्हाला माहित नाही का? विधवा स्रीला आपल्या समाजात काय कीमत देतात कुठल्या नजरेन पाहतात, बिना बापाच्या मुलाना ही लोक चांगल्या नजरेंन पाहत नाही हो आबासाहेब, इथली कर्मठ लोकांची वाणी 'रांडची पोर सांड' म्हणतात, बाप नसलेल्या मुलीशि लोक लग्न करायला का हो घाबरतात ही लोक, तुम्ही थोडाही विचार नाही केला आमचा आमच्या भविष्याचा तुम्हाला वाटल तेच तुम्ही करत राहिलात.
    आबासाहेब आज तुम्ही राहिला असतात तर तुम्हाला खुप आनद झाला असता, कारण आज तुमचा लाडक़ा पूर्ण महाराष्ट्रात समाज प्रबोधन करत आहे, विविध नाटकात साहबाघ घेत आहे, तुमच्या सारखच खुप वाचन करतो खुप लिहितो, परंतु सर्व करत असताना आज कुठेतरी कसली तरी कमी वाटते पुर्णताहा आनंद मिळत नाही, मला नेहमीच इतरानं कडून प्रेमाची अपेक्षा असते म्हणतात ना ज्याला घरातून प्रेम मिळत नसेल तर तो बाहेर प्रेम शोधन्याचा प्रयत्न करतो परंतु ते ही मिळत नाही.
    आबासाहेब तुमच्या नंतर आईने आमच्या साठी खुप काही केल कधी तुमची कमी नाही भासु दिली परंतु आज Facebook, what'sup, वर मित्रांच्या वडिलांन सोबत पाहिलेल्या फोटोनि तुमची कमी भासलि आणि तुमच्या आठवणीत हा आजचा प्रपंच मि बाप नसलेल्या मुलान सामोर ठेवत आहे.
                                        तुमचाच लाडक़ा.
                                              तुषार पुष्पा दिलीप सूर्यवंशी ( ती & तु ).

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

लोकतंत्र की लड़ाई में युवा वर्ग कहा हैं?