भीमकोरेगाव कारण आणि परिणाम.

भीमाकोरेगाव कारण आणि परिणाम.
   नमस्कार मी तुषार सूर्यवंशी मुद्दामच नावाने सुरवात करतो आहे, मी धर्माने हिंदू कुणबी, जातीने कुणबी पाटील ( मराठा ) मी काही तुमच्या पेक्षा वेगळा नाही परंतु या लोकशाही राज्यात जातीची धर्माची ओळख करून देण किती गरजेचं झालं आहे याचं जितजागत उदाहरण म्हणजे भीमकोरेगाव,
          1 जानेवारी 2018 रोजी अनेक लोक नवीन वर्षाचा नवीन संकल्प करतात आणि नवीन वर्षाची सुरवात करतात. त्यात संबंध 125 कोटी लोकसंख्या असलेला भारत अनेक प्रकारचे संकल्प करत असतो परंतु आज 21 व्या शतकात इथली व्यवस्था इतक्या प्रमाणात रूढ झाली आहे की नवीन वर्षाच्या संकल्प देखील इथली व्यवस्था सांगेल तोच करायचा आणि तसाच करायचा. नेमकं झालं असच 1 जानेवारी 2018 ला भीमकोरेगाव प्रकरण घडवून अनेक जातीतली जी तरुण मुलं-मुली नवीन वर्षाच्या निमित्ताने अनेक धर्मनिरपेक्ष संकल्प करतात, ज्यात स्वतःच्या हाताने कोणाच नुकसान होणार नाहीत, कोणाच्या भावना दुखवल्या जाणार नाहीत, चुकीच्या गोष्टी, घटना ज्यामुळे राष्ट्र निर्मितीला बाधा येइल त्या गोष्टी टाळूया, दोन जातीत एकोपा निर्माण झाला पाहिजे म्हणून अनेक संकल्प सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा व्ययक्तिक पातळीवर इथली तरुण मुल/मुली करतांना माझ्या निदर्शनास आले आहे. आणि या भीमकोरेगाव च्या प्रकारणामुळे अनेक दलित, मराठा तरुण यांनी इतके भयानक संकल्प केले आहेत जसे की.
#दलित तरुणांकडून- आता या मराठा जातील दाखवून देऊ की आम्ही पण बाबा साहेबांचे लेकरू आहोत, अनेक गाणी त्या काळात सोशल मीडियावर वाजवली गेली "किती भी लावा युक्ती किती भी लावा शक्ती तरी मजबूत भीमाचा किल्ला" प्रत्येकाच्या शोषलमीडियांच्या वॉलपेपर वरती निळा झेंडा लावण्यात आला.त्याच्याच उलट
#मराठा तरुणानं कडून- ही दलित आमची बरोबरी कशी करतात हे पाहूनच घेऊ, यांच्या बापाने कायदा लिहिला म्हणून काय हे कायदा हातात घेतली का? यांनी देखील आपापल्या वॉलपेपर ला भगवा झेंडा लाऊन असे अनेक प्रकारचे संकल्प इथल्या तरुणांनी घेतली  ज्यामुळे भविष्यात याहीपेक्षा जास्त अराजकता माजेल अस म्हणायला वावग ठरणार नाही. याला जबाबदार त्यांचं अज्ञान आणि आपआपल्या जातीची अस्मिता आहे जी त्यांच्या हिताची नाही आणि ज्यांनी हा भीमकोरेगाव चा कट जे ध्येय धोरण डोळ्यासमोर ठेऊन रचला होता त्यांचा तो कट सफल झालेला आहे. या घटनेवर अनेक पुरोगामी सामाजिक संघटनांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले, काहीनि आपली सामाजिक आणि राजकीय पोळी देखील या घटनेवर भाजून घेतली, काहींनी मनातला आक्रोश इतर जातीच्या विरोधात होता तो व्यक्त केला आणि काही तज्ञानी वुत्तपत्र, शोषलमीडिया, न्युज मीडिया यांच्या माध्यमातून त्या घटनेचे कारण/परिणाम सांगितले की ही घटना म्हणजे दोन जाती धर्मामध्ये संघर्ष निर्माण करण्यासाठी आहे असं सांगत शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. परंतु याही नंतर अतिशय महत्वाचे कारण/परिणाम जे सामान्य माणसाला हानिकारक आहेत जे भीमकोरेगाव घटने माघे होते ते मात्र नजरंअंदाज करण्यात आले.
        वर्षाच्या सरत्या शेवटी पर्यँत म्हणजे 31 डिसेंबर 2017 पर्यँत इथल्या व्यवस्थेच्या विरोधात सरकारच्या विरोधात अनेक प्रकारचा आक्रोश स्वतःच्या हक्काणसाठी स्वतःच्या हितसंबंधांसाठी इथला शोषित, पिळीत, वंचित वर्ग ज्यामध्ये अनेक जाती धर्म आहेत तो वर्ग जागरूक झाला आणि आपल्या हक्कांसाठी लढू लागला, अन्न, वस्त्र , निवारा या बरोबरच शिक्षण आणि आरोग्य किती गरजेचे आहे हे लोकांना समजू लागले , त्याच बरोबर समाजात विविध जातींमध्ये खास करून दलित आणि मराठा यांच्या मध्ये एकोपा निर्माण होत होता, रोटी व्यवहार बरोबर बेटी व्यवहार व्हायला देखील सुरुवात होत होती अनेक दलित - मराठा तरुण आपल्या हक्कासाठी रस्त्यावर येऊन आंदोलन करू लागली होती, रोहित वेमुलाच्या हत्येनंतर हा बदलाचा आक्रोश जास्तच वाढून आला एक विद्यार्थी नेता JNU च्या विचारपीठातून तयार होऊन संविधान जागर करू लागला, जो नेता महाराष्ट्रत तयार झाला नाही तो गुजरात मध्ये तयार झाला आणि 56 इंच छाती फोडत सत्येत आला. त्यामुळे व्यवस्थेच्या/सरकारच्या विरोधात एक मोठं संघटन उभं राहू लागल, एकंदरीत मनू व्यवस्थेला, सरकारच्या भविष्याला कुठेतरी तळा जात होता, आणि या मनू विचारसरणी असलेल्या सरकारच्या चुकीच्या निर्णयांना जागृत तरुण बगल देऊ लागला होता. दिवसा ढवळा चळवळीच्या नायकांना गोळ्या झाळून त्यांची हत्या करण्यात आली दाबोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश याच ज्वलत उदाहरण आहे. आणि  एकीकळे हेगडे सारखा नेता संविधान बद्दलवण्याचि भाषा करतो ( संविधान बदलनेके लिये हम सत्ता मे आये हे ), मुळात ज्यांनी हे भारतीय संविधान नाकारलं होत तीच लोक आता संविधानाचा वापर करून सत्तेत आले आहे, ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अतिशय त्रास दिला, ज्यांनी गांधींची हत्या केली ज्यांनी सावित्रीमाईना शेण दगड गोटे मारले तेच आता या महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचत आहे आणि हे सर्व महापुरुष जणूकाही आमची जहागीरदार आहे असं ढोंग रचत आहे. याला देखील एक मोठं राजकीय कारण आहे या महापुरुषांनच नाव घेतल्या शिवाय यांना आता कोणीही उभं करणार नाही हे त्यांच्या लक्षात आले आहे म्हणून त्यांच्या सोई नुसार महापुरुषांनचा वापर ते करत आहे.
                  सरकारी शाळा बंद करून शिक्षणाचं बाजारीकरण सुरू करण्याचा निर्णय ही तत्कालीन सरकार घेते, ओबीसी (BOC) चे UPSC परीक्षा पात्र असलेले 315 तरुनांणा नवीन कायद्या अंतर्गत अपात्र ठरव्यात आले, शेतकऱ्यांना कर्ज माफीची घोषणा करून योग्य ती कर्ज माफी करण्यात आली नाही, सरकारी वसतिगृह बंद करून तिच्यात राहणाऱ्या मुलांच्या बॅंकेत त्याचे पैसे जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला, शिष्यवृत्ती वेळेवर न पाठवणे असे अनेक चुकीचे निर्णय घटना घळत होत्या आणि त्या मुळे समाजात एकोपा निर्माण होऊन व्यवस्थेच्या विरोधात सरकारच्या विरोधात आक्रोश निर्माण होऊन लागला त्यामुळे व्यवस्थेचं/सरकारच भविष्य धोक्यात येत आहे हे त्यांच्या लक्षात येताच वरील प्रश्नांपासून याजागरूक जनतेचं दुर्लक्ष होऊन पुन्हा जाती धर्मात भेद निर्मार्ण होऊन जाती आणि धर्म बळकट होऊन पुढच्या काही वर्षांसाठी राजकीय मुद्दे तयार होतील आणि सत्ता उपभोगता येईल हे राजकीय आणि पुन्हा एकदा मनुव्यवस्था निर्माण होईल हे सामाजिक कारण तसेच जर ही जनता जागरुक झाली तर शिकेल आणि आपल्या हक्काणसाठी लढत उच्च पदावर आपल्या बरोबरीला येऊन प्रबळ होईल म्हणून आपल्याला उच्चपदावर राहून सत्ता,पद उपभोगता येतील हे आर्थिक कारण.
       असे महत्वाचे कारण या भीमकोरेगावच्या घटनेमाघे होते आणि आपल्याला एकच कारण निदर्शनास आल ते म्हणजे दोन जातीत भांडण. परंतु इथल्या बहुजन समाजाने आता लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या हक्कासाठी आता एकच शश्र आहे ते म्हणजे आपला भारतीय संविधान जो पर्यंत संविधान अस्थितवात आहे तो पर्यंत लोकांचा विवेक, हक्काची जाणीव, शिकण्याची जिद्द इथल्या बहुजन समाजामध्ये असणार आहे बहुजन समाजाने जागरूक राहून अशा घटनांना बळी पळता काम नये पुन्हा जाती धर्मच्या भिंती तोळून जो संदेश आम्हाला शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांनी दिला तिच्यावर मार्गक्रमण करत एक प्रगत राष्ट्र निर्माण केलं पाहिजे.
तुषार पुष्पा दिलीप सूर्यवंशी. ( ती & तु )
९५०३५२१२३५
Email- suryawanshitushar41@gmail.com
विद्यार्थी.

Comments

Popular posts from this blog

लोकतंत्र की लड़ाई में युवा वर्ग कहा हैं?