पाच रुपयांतही विकला जातो इथला बलात्कार.


       28 डिसेंबर रोजी एका वृत्तपत्रात बातमी आली की एका वृद्धाने दोन लहान मुलींवर बलात्कार केला आणि 5 रुपये देऊन वाचा न फोडण्यास सांगितले आता यात आचर्य वाटण्याजोग काही कारण नाही “नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो” च्या अहवाल नुसार भारतात रोज 92 च्या वर बलात्कार होतात 2013 च्या आकडेवारी नुसार 1 लाख महिलां माघे 1 हजार 336 महिलांवर बलात्कार होतात, आता 5 वर्षा नंतर 2017 मध्ये या आकडेवारीने किती ऊचांक गाठला असेल याची कल्पनाच केलेली बरी मात्र कुठेही या 1 हजार 336 किंवा त्याहून अधिक बलात्काराच्या विरोधात आवाज उचलला जात नाही अथवा मोर्चे निघत नाहीत यावर माझा कवी मित्र ‘गोपाल बागुल’ त्यावर फार छान म्हणतो की “फ्लेवराईज झालाय इथला प्रत्येक बलात्कार” आणि त्याच्या बोलण्या नुसार बलात्कारा नंतर आवाज उचलणे म्हणजे फक्त राजकीय, धर्मीय अस्मितांचा आक्रोश, आणि आपापल्या हिताच्या पोळ्या भाजन अस म्हटलं तरी वावग ठरणार नाही.
                         राजकीय मुद्दे संपलेत की इथल्या प्रस्तापित, भांडवली, राजकीय नेत्यांना चगळण्यासाठी कुठली ना कुठली गोळी हवी असतेच त्यात दिल्ली-निर्भया, खेरलांजी, कोपर्डीच्या बलात्कारामुळे गेल्या काही काळात ज्या मुद्यावर सामाजिक, राजकीय, धर्मीय अस्मिता मोठया प्रमाणावर उफाळून आल्या होत्या त्यावर मला कधी तरी प्रश्न पळतो की ही मंडळी राजकारणासाठी बलात्कार होण्याची वाट पाहतात की काय? की स्वतःहा बलात्कार घडवून आणतात?
मुळात बलात्कार म्हणावं तरी कशाला असा एक प्रश्न माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो, जे बलात्कार उघळकीस येतात त्याला आपण बलात्कार म्हणूयात मात्र जे जगा समोर येतच नाही त्यांना आपण काय म्हणायचं, का फक्त एखादी जातीय बलात्कार घेऊन त्यावर राजकारण करण्याचा प्रयत्न करायच.
                    खैरलांजी बलात्कार निषेधार्त आहेच मात्र खैरलांजी सारखे अनेक बलात्कार इथल्या दलित वर्गावर आज तागायत झालेले आहेत मात्र त्यावर नजर अंदाज करण्यात आले, त्याच्या विरोधात कुठेही आवाज उचलला गेला नाही. तसाच दिल्ली कोपर्डी बलात्कारही निषेधार्त आहेच मात्र ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या’ अहवाल नुसार 2013 मध्ये संपूर्ण भारतात 33 हजार 707 बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत यात दिल्ली बलात्काराचे प्रमाण 4.85 इतके आहेत मात्र तेही पोलीस ठाण्यात दाखल झालेलेच त्यातील एकाही बलात्काराच्या विरोधात एकही मोर्चा निघाला नाही एकही वर्ग रस्त्यावर उतरला नाही याला नखी काय म्हणावं? मला या सर्व बलात्काराचा निषेध नोंदवायचा आहेच परंतु प्रश्न असा उपस्थित करायचा आहे की दिल्ली प्रकरणात जीन्स टीशर्ट परिधान करणाऱ्या, रात्री उशिरा पर्यँत जसा मुलांना बाहेर असण्याचा अधिकार आहे तसाच अधिकार घेऊन उशिरा पर्यंत बाहेर असणाऱ्या मुलीवर (निर्भयावर) बलात्कार होतो तेव्हा मात्र खूप मोठया संख्येने कँडल मार्च काढत तशाच मुली ज्या जीन्स परिधान करतात ज्या रात्री उशिरा पर्यँत बाहेर असतात त्याच्या लक्षात येते की आज या मुलीवर बलात्कार झाला उद्या आपल्यावर होऊ शकतो म्हणून त्या मुली, त्यांचे पालक निर्भयाच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरतात आणि अगदी काही वर्षांच्या आत तिला न्याय मिळून पुन्हा तसा बलात्कार करणाऱ्या वृत्तीला धडा मिळतो. त्यासाठी न्याय पालिकेचे आणि न्याय मागण्यासाठी प्रयत्न केलेल्यांचे अभिनंदनच. परंतु या पालिकळे जाऊन जेव्हा मी विचार करतो तेव्हा माझ्या लक्षात येत की मुळातच आपला समाज विविध वर्गात विभागला गेला आहे आणि त्यातलाच एक वर्ग जो  पोटा पाण्यासाठी, रोजगारासाठी स्थलांतरित होऊन ऊस तोडीचे काम करून पोट भरत असतो, तेव्हा त्या उसाच्या मळ्यात 13 वर्ष मुलीपासून तर 55 वर्षाच्या महिले पर्यँत कित्तेक बलात्कार त्या वर्गावर होत असतात मात्र ते बलात्कार तिथेच त्या उसाच्या चार भिंतीत दाबले जातात तेव्हा तिचा आवाज त्या वर्गा पर्यँत पोहोचत नाही जो मोठया प्रमाणात प्रस्थापित आहे जो निर्भयासाठी रस्त्यावर उतरतो त्याच्या पर्यँत तिचा आवाज पोहोचत नाही आणि असे कित्तेक बलात्कार तिथेच दाबले जातात, मग उसाच्या मळ्यात काम करणाऱ्या महिलेवर असो किंवा सालदार म्हणून काम करणाऱ्या महिलेवर असो, पोटासाठी स्थलांतरित होणारा वर्ग जेव्हा बलात्कार नंतर न्यायाच्या प्रतीक्षेत असतो तेव्हा त्यांच्या न्यायासाठी का? म्हणून कँडल मोर्चा काडत नाही, का? म्हणून कोणी रस्त्यावर येत नाही, कारण तो वर्ग वंचित आहे पिळीत आहे. त्या मळ्यात जाऊन काम करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही आणि तशी वेळ आली नाही म्हणून आपल्यावर अथवा आपल्या मुलींवर बलात्कार होण्याची संभावनाच नाही म्हणूनच तो प्रस्तापित वर्ग त्यांच्या न्याया साठी रस्त्यावर उतरत नाही. म्हणजे आपल्या या लोकशाही देशात ज्या लोकशाहीने समता धिष्ठित न्यायप्रणाली दिली त्या न्याय प्रणालीत त्यालाच न्याय मिळतो ज्याची संख्या सामाजिक, धार्मिक, राजकीय, आणि आर्थिक क्षेत्रात जास्त आहे. जो वर्ग प्रस्थापित झाला आहे त्याच बलात्काराच्या विरोधात आवाज उचलला जातो ज्या बलात्काराचा आवाज राजकारणाचा मुद्दा ठरू शकतो त्याच बलात्कारा साठी मोर्चे निघतात, इथल्या समता धिष्ठित न्यायाला विशिष्ट वर्गासाठीचं झुकवल जात.
                     याच जितजागत उदाहरण म्हणजे कोपर्डी बलात्कार प्रकरण, कोपर्डी बलात्कार देखील निषेधार्त आहेच परंतु बंगळूर मधील ‘व्हीबग्योर इंटरनॅशनल’ शाळेत दोन शिक्षकांनी एक 6 वर्षाच्या विद्यार्थीनीवर बलात्कार केला, ज्या आयोद्यात रामाचा जन्म झाला म्हणतात त्याच आयोद्यात जनक मंदिरात 5 साधू जे धर्माची ठेकेदारी करतात त्यांनी आई आणि मुलीवर सामूहिक बलात्कार केला, इतकच नाही तर हरियाणातील कैथल या गावात एका पुजारीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला, मथुरा जिल्यातील बरसांना मंदिर असेल किंवा अजून कित्येक मंदिरात धर्माच्या ठेकेदारांकडून बलात्कार होतात, शेतात रोजंदारीवर काम करणाऱ्या  मुली महिलांवर रोज एक बलात्कार होतो, तृतीय पंथीनवर देखील बलात्कार होतात, इतकच नाही तर 70 वर्षाच्या म्हातारीवर देखील बलात्कार होतो मात्र या सर्व बलात्काराणा नजर अंदाज केलं जातं आणि एक असा बलात्कार हाताशी घेतला जातो जो जातीने प्रस्थ असतो, ज्या बलात्कारावर राजकीय पोळी भाजता येऊ शकते अशा बलात्कारावर लाखो ने मोर्चे निघतात आणि त्या दोन वर्षातच तिला न्याय मिळतो, त्या साठी पुन्हा एकदा न्याय पालिकेचे अभिनंदन केले पाहिजेच, मात्र या न्यायात मला कुठेतरी तफावत जाणवते, खेरलांजी सारख्या भीषण बलात्काराला ज्या बलात्कारात पूर्ण गाव साक्षीला असतांना त्याला 10 वर्ष उलटून जातात तरी भूतमांगे परिवाराला न्याय मिळत नाही यात ज्याला तफावत दिसत नाही म्हणजे तो आंधळे पणाच डोंग रचत आहे असा आरोप करायला मला गैर वाटत नाही.
    याही पालिकळे जाऊन मला त्या बलात्कारा बद्दल बोलावसं वाटत ज्याला आपल्या संस्कृतीत कुठेच स्थान नाही मात्र संस्कृतीची पूजा करणारेच तिथं आपली वासना भागवतात आणि त्याला वैश्या, रांड असे नाव देऊन मोकळे होतात, कुठल्याच महिलेला वाटत नाही की अनेक पुरुषांनी यावं आणि आपल्या योनीचा भोग घ्यावा मात्र तिला आपल्या पोटापाण्यासाठी त्या क्षेत्रात इच्छा नसतांना ही जावं लागत, काही वेश्या महिला या देवदासी प्रथेतून येतात, तर काही प्रेमामुळे आणि काही वैश्याना जबरदस्तीने वैश्या व्यवसायात उतरवलं जात आणि एकदा त्यांना वैश्यापणाच धब्बा लागला म्हणजे समाज तिला अमान्य करतो आणि मग तिला त्यातून बाहेर पळता येत नाही मग नाईलाजाने तिला आपली योनी वैश्या बाजारात खुंटीला टांगून ठेवावी लागते.
                त्याही पलिकळे जाऊन मला त्या बलात्कार बद्दल बोलावसं वाटत ज्याला कधीच समाज बलात्कार म्हणून स्वीकारणार नाही, जेव्हा एखाद्या मुलीच लग्ना अगोदर एका मुला सोबत प्रेम संबंध असतात आणि जेव्हा त्यांच्या लग्नाचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा अनेक अडचणी निर्माण होतात, मुलगा अथवा मुलगी आपल्याच जातीत असले तर विचार केला जातो मात्र तिथेही खालच्या अंगाचे आहेत आपन वरच्या अंगाचे आहोत मग ते आपल्यात बसत नाही, गोत्र एकत्र येत नाही शनी आहे मंगळ प्रवेश करत नाही असे अनेक कारण देऊन ते प्रेम प्रकरण नाकारल जात. हे जातीतच असणाऱ्या प्रेमा पर्यँत ठीक आहे मात्र जाती बाहेर प्रेम असेल तर लग्न होईल हा प्रश्नच निर्माण होत नाही त्यातल्या त्यात धर्मा बाहेर असेल तर तो जिहाद ठरवला जातो मुळात डॉ. बाबा साहेब आंबेडकर म्हणतात की जाती संपवांच्या असतील तर अंतर जातीय अंतर धर्मीय विवाह केली पाहिजे कारण स्त्री ही जाती अंताचा प्रवेशद्वार आहे. या सर्व पलिकळे विचार केल्यास आपल्याला लक्षात येत की त्या मुलीच ज्या मुलावर प्रेम होतं तिला त्याच्या पालिकळे कोणासोबतच लग्न करून संबंध ठेवण्याची इच्छा नसते मात्र तिला नाईलाजाने समाजाचा  आणि आपल्या कुटुंबाचा विचार करून जबरदस्तीने दुसऱ्या मुला सोबत लग्न करून संबंध ठेवावे लागतात, याला ठरवून केलेला बलात्कार अस नाव देता येईल.
जब मे जाता हु शादी के मंडप
मे तो दुल्हन से खत आता हे,
आगये साहब मेरा जनाजा उठाणे
पुछा ही नही मेरा प्यार जो जाती से अलग हे,

आपके साथ सोभी लुंगी
मे अपना बदन बेचकर,
चाहो तो मे बंद ही रहूनगी
आपकी बिकी सोछ मे,
आपणे हमे दहेज देकर जो बेचा हे.
       या नंतर ही बलात्कार थांबत नसतो आपल्या बायकोची इच्छा नसतांनाही तिच्या सोबत जर तिचा नवरा जबरदस्तीने संबंध ठेऊ इच्छित असेल तर याला देखील आपण बलात्कार म्हटल पाहिजे, अगदी तसच लग्ना अगोदर आपली प्रियसीची इच्छा नसताना प्रियकर तिच्यावर जबरदस्ती करत असेल तर त्याला बलात्कार कातर त्याला बलात्कार का म्हणू नये? असे अनेक बलात्कार दैनंदिन जीवनात समाजात होत असतात मात्र आपल्याला त्यालाच बलात्कार म्हणावसं वाटत जो न्यायालयापर्यंत जातो ज्याची नोंद पोलीस ठाण्यात होते, जो बलात्कार उच्चभ्रू वर्गावर झालेला असेल तर त्याला बलात्कार म्हणायचं आणि शोषित, वंचित, गरीब वर्गावर झालेल्या बलात्काराला लैंगिक शोषण म्हणून नजर अंदाज करायचं, जर बलात्काराचं प्रमाण थांबवायचं असेल स्त्री च्या वेदना थांबवायच्या असतील तर महाविद्यालयात मुलांना लैंगिक शिक्षण देणे आज काळाची गरज झाली आहे, मनूने ठरवलेल्या पितृसत्ताक संस्कृतीत आधीच महिलांवर खूप अत्याचार झालेत होत आहेत, मोठया प्रमाणात त्यांचं शोषण केलं जातं होत आज तागायत केलं जातं आहे ती मनू संस्कृती नष्ट करून स्त्री पुरुष समानता झाली पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थाने स्त्री स्वतंत्र होईल.

तुषार पुष्पा दिलीप सूर्यवंशी. ती& तु
विद्यार्थी.


Comments

Popular posts from this blog

लोकतंत्र की लड़ाई में युवा वर्ग कहा हैं?