Posts

Image
महिला और तृतीय पंथि का किरदार. साथियो आज में एक ऐसे विषय पर लिखने जा रहा हु। जिसे पढ़कर आप शायद मुझे औरत का दर्जा दे सकते हो। या शायद मेरा मजाक उड़ा सकते हो वैसे भी हमारे समाज मे औरतो का मजाक ही उड़ाया जाता है उनको हमेशा कम समजा जाता है। अगर कोई औरत कह दे कि में अधिकारी बनाना चाहती हु या कह दे कि में पुरुषोसे हमेशा आगे ही रहती हूं। तो उसका मजाक उड़ाया जाता है। समजा जाता है कि वो कुछ कर नही सकती पुरुषो के आगे जा नही सकती। जबकि औरोतो की अपनी एक अलग पहचान होती है अपना एक अलग अस्तित्व होता है उसे पुरूषों से जोड़कर देखना यानी उनको कम समजने जैसा है। चलो छोड़ो उसपर अलग तरीकेसे लिखा जा सकता है। में अपने एक अनुभव के साथ शुरवात करता हु। में हमारे मु.जे. महाविद्यालय जलगाव में मानसशास्त्र इस विषय मे पदवी की शिक्षा ले रहा था तब हर किसी के महाविद्यालय में वार्षिक स्नेह संमेलन होता है वैसे हमारे महाविद्यालय में हुवा था तब उसमें लगभग दो साल मेरे दो दोस्तों के साथ मेने स्री(औरत) का पात्र निभाया था जिसमे एक साल सिर्फ दो औरत और दूसरे साल दो औरत और उसका एक पति जिसमे मेरा नाम था चंचला और दूसरी का नाम था मंचला...
यूपीच्या छपरा शाळेत एका 9 वर्षाच्या बालिकेवर शिक्षक, मुख्यधापक सहित 15 विद्यार्थी बलात्कार करतात तेव्हा. भारत महिला असुरक्षिततेत पहिल्या क्रमांकावर जेव्हा येतो तेंव्हा देशात होणाऱ्या महिलांवरच्या बलात्काराला कोणत्या एका अंगाने पाहुन भागत नाही पॉर्न व्हिडीओ पाहिल्याने बलात्काराचे प्रमाण वाढत आहे, मुली शॉर्ट घालतात त्यामुळे बलात्काराचे प्रमाण वाढत आहे, संस्कृती लोप पावल्यामुळे बलात्काराचे प्रमाण वाढत आहे अशा अनेक अंगाने पाहून बलात्कारचं विश्लेषण करता येईल का हा प्रश्न कायम आहे. नुकताच यूपी एका शिक्षणाच्या मंदिरात झालेल्या सामूहिक बलात्काराचा आपण विचार केला तर त्यात बलात्काराचा व्हिडीओ काढून ब्लॅकमेल केलं जातं आणि मुख्यध्यापक सहित 18 विध्यार्थ्यांन कढून बलात्कार केला जातो तेव्हा या घटनेत काही विचारवंत प्रवक्ते म्हणतात की "इतक्या दिवस बलात्कार करत असताना त्या बलिकेने घरी अथवा पोलीस ठाण्यात सांगण्याची हिम्मत का केली नाही" तर त्याचा अर्थ त्यांनी कोणत्या अंगाने लावला असेल ते त्यांना आणि त्यांच्या बुद्धिमत्तेला माहीत, परंतु बलात्काराकडे पाहतांना तो बलात्कार वासना क्षमवण्या साठी ...
#मातंग #महार #चांभार #दलित #बुद्ध, #तेली #माळी #कुणबी #मराठा #राजपूत मातंग समाजाच्या नवरदेवाने मंदिरात प्रवेश केल्यामुळे 24 मातंग कुटुंबांना सोडावं लागलं गाव. बाबा साहेबांच्या काळाराम मंदिराच्या प्रवेशा नंतर ही वस्तुस्थिती सर्व बुद्धिजीवीना विचार करायला लावण्याजोगी आहे जाती पाती संपल्या म्हणून पळ काढणारी माणसाची जात जाती टिकवण्यात नेहमीच पुढे असते. हे का ? झालं असं होतं राहणार आहे का ? अजूनही स्वतंत्र भारतात मंदिर प्रवेश, विहिरीत पोहोल्याने पाणी बाटने, कनिष्ठ जाती ने मुछ ठेवल्यास हत्या करणे असे प्रश्न उपस्थित असतील तर माणसाला माणूस म्हणून वागवलं जाणार आहे का ? माणसाचा इतर शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रगती कधी होणार आहे का ? का फक्त वरिष्ठ जातीतील लोकांनीच त्यातही काही वर्गातील लोकांनीच प्रगती करता येणार आहे, समाजात मुप्तपणे वावरता येणार आहे ? इथल्या राजकीय पक्षांना या सर्व गोष्टींकडे पाहणे महत्वाचे वाटते की नाही का यांना जाती धर्म अजून घट्ट करायच्या आहेत आणि त्यावर राजकारण करायचं आहे ? या सर्व गोष्टींचा विचार जातीअंत, वर्गजातीअंत, मानवमुक्तीचा लढा लढणाऱ्या सामाजिक, राजकीय संघट...
लोकशाही की हुकूमशाही अलिगढ मध्ये एका शिक्षकाने फेसबुकवर ब्राम्हणवादावर पोस्ट टाकली म्हणून त्या शिक्षकाला पोलिसांच्या समक्ष आमदाराच्या पाया पडून माफी मागावी लागली. गुजरात मधील एका महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी एका प्राध्यापकावर शाही फेकून प्राध्यापकाला मारहाण केली, त्याची मिरवणूक काढण्यात आली. एकीकडे गुरू आणि शिष्याची संस्कृती सांगायची आणि दुसरीकडे शिक्षकाला सत्तेचा माज दाखवत हुकूमशाहीने पाया पडायला भाग पाडायच. प्राध्यापकावर शाई फेकून त्याला मारहाण करणे याला नक्की म्हणावं तरी काय लोकशाही की हुकूमशाही? असा प्रश्न सध्या डोळ्यांसमोर येतो. कारण लोकशाहीला नाकारणारी "हे संविधान आम्हाला मान्य नाही म्हणणारी", "संविधान बदलनेके लिये हम सत्ता मे आये है" बोलणारी यांची विचारधारा जेव्हा संविधानाच्या मार्गाने सत्तेवर येते तेव्हा त्यांच्या कडून फार अपेक्षा करणे मूर्खपणाच ठरत. नुकतच आणीबाणीला ४३ वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने अपेक्षित असल्याप्रमाणे आमचे आदरणीय प्रधानमंत्री यांनी संधीचा फायदा घेत काँग्रेसवर टिकेचा आसूड सोडला. राजकारणाची पोळी...
रक्षाबंधन. रक्षाबंधन मी मानीत नाही सर, कारण ती एक संस्कृती आहे म्हणून नाही, तर मी त्याच्या कडे वेगड्या दृष्टीने पाहतो .बहिणीची रक्षा करायला तिला स्वतःच्या भावा कडून राखी भाधून तिच्या सुरक्षिततेचे आश्वाशन घ्यावे लागेल का? म्हणजे भावाने तिची सुरक्षा करावी याचा अर्थ पुन्हा एक स्त्री म्हणून ती सक्षम नाही असं आपण म्हटलं तरी वावग ठरणार नाही, धाडसी काम असलं तर पुरुष आणि नाजूक काम असलं तर स्त्री असा समज आज जरी स्त्री सक्षम झाली असली तरी तसाच आहे, रक्षा बंधन ला तिच्या कडून राखी भाधायची आणि फक्त सुरक्षेचे आश्वासन करावं, दुसरं कोणतं का नाही? एक स्त्री म्हणून आपण तिला वागवतो पण माणूस म्हणून वागवतो का? अगदी आपल्या वया पासून सुरवात केली तरी चालेल या वयात आपण सर्व प्रेम करतो पण स्वतःच्या बहिणीचा विषय आल्यास आपण ते नाकारतो तेव्हा आपल्याला काळजी वाटते ती आपल्या अब्रूची, आपल्या जातीची, आपल्या परंपरांची, आणि मुख्य म्हणजे आपल्या संस्कृतीची तेव्हा आपल्याकडे धागे दोरे बांधतांना आपण आश्वासन करत नाही तिला प्रेम करण्याचा अधिकार देऊ अस,तिला तिच्या पसंतीचे कपडे घालण्याचा अधिकार देऊ, तिला वाटले तो पर्यँ...
प्रिय गरिबी. आज तू मला तुझ्यावर लिहिण्यास मजबूर केल परंतु तुझ्यावर लिहीत असताना दोन प्रश्न मला पडलेत, एक म्हणजे तुला प्रिय तरी का? म्हणाव, आणि दुसरं म्हणजे तुझ्यावर लिहिल्या नंतर तुझ्या पर्यंत हे लिखाण कस कुठे आणि केव्हा पोहचवाव, कारण तू कधी कुठे आणि कशी भेटशील याची खात्री नाही. तशी तू नेहमी असतेच एक वेळ जेवणाऱ्याजवळ, झोपडीत, रस्त्यावर झोपणाऱ्या जवळ, खूप असून उपाशी असणाऱ्या जवळ, तू दिसतेही मला दररोज गाडीत भीक मांगताना, पोटासाठी भर उन्हात राबत्तांना, बैल नाही म्हणून स्वतःला नांगराला जुपतांना, शिक्षणासाठी उपाशी राहून काम करतांना, पैशा साठी देह विकत्तांना, पैसे नाहीत म्हणून देह कापतांना, कधी एका वेळेच्या भाकरीत, तर कधी पोट भराव म्हणून पिणाऱ्या पाणीत अशा अनेक ठिकाणी मी तुला पाहिलं अनुभवलं परंतु तुला कधीच कोणती तक्रार केली नाही परंतु आज मात्र मला असहाय्य झालं. सांग ना जन्माला आलो तेव्हा तूच भेटली, आणि तेव्हा पासून अजूनही मला सोडायला तयार नाही, अजून किती तुला सहन करायच, अजून किती रात्र उपाशी झोपायचं, तिने दिलेले पैशे नेहमी शिक्षणालाच लागतात मग ती विचारते जेवलास का तेव्हा ईच...
Image
फेसबुक चाळत असतांना "ADWAIT " यांच्या ब्लॉगवर जाऊन केविन कार्टरया जगप्रसिद्ध छायाचित्रकाराने काढलेल्या चित्रा बद्दल वाचले आणि मन सुन्न झाले त्या बद्दल काही त्यांच्याच ब्लॉगवरतून. केविनचा जन्म साउथ आफ्रिका मधील जोहान्सबर्ग येथे १९६० साली झाला. फोटोग्राफीला सुरुवात केल्यानंतर केविनने लवकरच ‘the bang bang club’ला जॉईन केले. मुख्यतः साउथ आफ्रिकेतल्या शहरांमध्ये कृष्णवर्णीय लोकांवर होणाऱ्या अत्याचाराचे, अन्यायाचे फोटो काढणाऱ्यांना ‘bang bang club’ या नावाने ओळखले जाई. हिंसाचार, खून, दंगलीचे फोटो काढणे हा केविनच्या कामाचा भागच होता. अनेकदा यासगळ्या त्रासापासून स्वतःला तोडून ठेवण्यासाठी तो ड्रग्जचा सहारा घेत असे. याच ‘the bang bang club’ या अंतर्गत १९९३साली सुदान येथे पडलेल्या भयंकर अश्या दुष्काळाची बातमी कव्हर करण्यासठी गेला. तिथे आयोड या एका छोट्याश्या गावात असलेल्या एका खाद्य पुरवठा केंद्राच्या काही अंतरावर त्याने हे चित्र काढले. या चित्रात दिसत असलेले छोटसे बाळ खरतर मुलगा आहे मात्र सुरुवातील हे छायाचित्र प्रकाशीत झाले तेव्हा मात्र ती मुलगी असल्याचे अनेकांचे मत झाले आ...