#मातंग #महार #चांभार #दलित #बुद्ध, #तेली #माळी #कुणबी #मराठा #राजपूत
मातंग समाजाच्या नवरदेवाने मंदिरात प्रवेश केल्यामुळे 24 मातंग कुटुंबांना सोडावं लागलं गाव.
बाबा साहेबांच्या काळाराम मंदिराच्या प्रवेशा नंतर ही वस्तुस्थिती सर्व बुद्धिजीवीना विचार करायला लावण्याजोगी आहे जाती पाती संपल्या म्हणून पळ काढणारी माणसाची जात जाती टिकवण्यात नेहमीच पुढे असते.
हे का ? झालं असं होतं राहणार आहे का ? अजूनही स्वतंत्र भारतात मंदिर प्रवेश, विहिरीत पोहोल्याने पाणी बाटने, कनिष्ठ जाती ने मुछ ठेवल्यास हत्या करणे असे प्रश्न उपस्थित असतील तर माणसाला माणूस म्हणून वागवलं जाणार आहे का ? माणसाचा इतर शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रगती कधी होणार आहे का ? का फक्त वरिष्ठ जातीतील लोकांनीच त्यातही काही वर्गातील लोकांनीच प्रगती करता येणार आहे, समाजात मुप्तपणे वावरता येणार आहे ?
इथल्या राजकीय पक्षांना या सर्व गोष्टींकडे पाहणे महत्वाचे वाटते की नाही का यांना जाती धर्म अजून घट्ट करायच्या आहेत आणि त्यावर राजकारण करायचं आहे ?
या सर्व गोष्टींचा विचार जातीअंत, वर्गजातीअंत, मानवमुक्तीचा लढा लढणाऱ्या सामाजिक, राजकीय संघटनांनी पक्षानी विचार करणं खूप महत्वाचे आहे नुसतच मी माझी संघटना माझा पक्ष माझी विचारधारा यावर बोंबलत न बसता एक मोठा सामाजिक, सांस्कृतिक, आणि महत्वाचा राजकीय लढा उभारला पाहिजे नाहीतर प्रतिगामी शक्ती एक दिवस हुकूमशाही लादण्यास, संविधान संपवून एक जातीवर धर्मावर आधारित संविधान जी आपल्या सर्वांना माहिती आहे ती तयार करण्यास यशस्वी होणार आहे.
तुषार पुष्पा दिलीप सुर्यवंशी.
suryawanshitushar41@gmail.com
स्त्री खरच शिकली का ? आज अनेक ठिकाणी स्त्री पुरुष समानतेच्या बाजार गप्पा मारल्या जातात मात्र त्या गप्पांमधून एकही स्त्री स्वतंत्र होऊन बाहेर येत नाही त्यावर कवी शेषराव धांडे म्हणतात- ते &स्वातंत्र्या&वर धुवाधार चर्चा करत होते, स्वतःच्याच बायकोला मात्र प्रतिष्ठेच्या नावाखाली- गुलामीची वागणूक देत होते. आणि याच स्वातंत्र्याचा भाग म्हणजे शिक्षण स्वातंत्र्य स्त्री शिक्षण स्वातंत्र्य मुळात स्त्री शिक्षणाचा विचार केला तर आज स्त्री खरच शिकली का ? का ? तिला शिकू दिल नाही, का ? तिच्या पर्यँत शिक्षण पोहोचलं नाही असे प्रश्न डोळ्या समोर येतात आणि कोणीतरी पितृसत्ताक विचारधारेचा शहाणा उभा राहतो आणि म्हणतो कोण म्हटलं स्त्री शिकली नाही आज अस एकही क्षेत्र नाही सामाजिक, राजकीय, शिक्षण जेथे महिला आघाडीवर नाही. दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्या नंतरही वृत्तपत्रांमध्ये भरभरून वृत्त येतात की यंदाही आघाडीवर मुलीच. यानुसार स्त्री शिकली अस वाटत असेल तर तो आपला भाबळा आशावाद आहे कारण विद्दे विना माती गेली | मति विना नीती गेली नीती विना गती गेली | गती विना वित्त ग...
Comments
Post a Comment