प्रिय गरिबी.
आज तू मला तुझ्यावर लिहिण्यास मजबूर केल परंतु तुझ्यावर लिहीत असताना दोन प्रश्न मला पडलेत, एक म्हणजे तुला प्रिय तरी का? म्हणाव, आणि दुसरं म्हणजे तुझ्यावर लिहिल्या नंतर तुझ्या पर्यंत हे लिखाण कस कुठे आणि केव्हा पोहचवाव, कारण तू कधी कुठे आणि कशी भेटशील याची खात्री नाही. तशी तू नेहमी असतेच एक वेळ जेवणाऱ्याजवळ, झोपडीत, रस्त्यावर झोपणाऱ्या जवळ, खूप असून उपाशी असणाऱ्या जवळ, तू दिसतेही मला दररोज गाडीत भीक मांगताना, पोटासाठी भर उन्हात राबत्तांना, बैल नाही म्हणून स्वतःला नांगराला जुपतांना, शिक्षणासाठी उपाशी राहून काम करतांना, पैशा साठी देह विकत्तांना, पैसे नाहीत म्हणून देह कापतांना, कधी एका वेळेच्या भाकरीत, तर कधी पोट भराव म्हणून पिणाऱ्या पाणीत अशा अनेक ठिकाणी मी तुला पाहिलं अनुभवलं परंतु तुला कधीच कोणती तक्रार केली नाही परंतु आज मात्र मला असहाय्य झालं. सांग ना जन्माला आलो तेव्हा तूच भेटली, आणि तेव्हा पासून अजूनही मला सोडायला तयार नाही, अजून किती तुला सहन करायच, अजून किती रात्र उपाशी झोपायचं, तिने दिलेले पैशे नेहमी शिक्षणालाच लागतात मग ती विचारते जेवलास का तेव्हा ईच्या नसताना तिला सांगाव लागत हो झालं जेवण, अजून किती त्या माऊली सोबत खोट बोलायच, नेहमीच सर्व म्हणतात परिस्थितीने गरीब असला म्हणून काय झालं मनाने श्रीमंत आहे ना! त्यांना आता काय सांगावं माझं मन माझं पोट भरत नाही, समाजात जरी चांगलं मन नाव कमवत असलं तरी समाज गरजेला मदत करत नाही, म्हणतात सर्वच इथं काही मदत लागली तर सांग पण मदत करणं दूर पण ऐकनही त्यांना जमत नाही, अगदी लहानपणापासून तुला जवळून पाहिलं पण आता तू नकोशी वाटते, कारण पदो पदी आज तूच मला भेटते तुझ्या मुळेच मला समाज अमान्य करतो, पण तरी कधी कधी तुच जगणं ही शिकवते, तुझ्या मूळे आज मी समाज भूषण झालो, समाजात मला तूच उगवते पण तरीही मला खाली पोट झोपवते, तुझ्या मुळे माझ्या बापन मला सोडल, नातेवाईकांनी कधी जवळ नाही केलं , मित्रांनी तिरस्कार केला, पदो पदी अपमान झाला सहन केला उभा राहिलो, पण तुला माझ्यावर एकदाही दया आली नाही, एकदाही वाटलं नाही की आता संपवू याची तक्रार आणि जगुदेयू याला सुखाने, परंतु तुही लक्षात ठेव नको मला तुझी दयेची भीख मलाही स्वाभिमान आहे.
पण एक दिवस येईल की तू स्वताहून मला सोडून जाशील पण मी तुला सोडणार नाही कारण मला माहित आहे आज तू मला सोडलं तरी दुसऱ्याला पकडणारच आहे, आणि पुन्हा कोणाच्या तरी आयुष्यात अंधार करणार आहे, आज मी मेणबत्ती सारखा जळतोय आणि असाच जळत राहील आणि एक दिवस वितळणाऱ्या मेणबत्ती सारख तुला ही जळवेल.
तुझाच.
TUSHR PUSHPA DILIP SURYAWANSHI.
लोकतंत्र की लड़ाई में युवा वर्ग कहा हैं?
एक तरफ़ देश में अंबेडकर वादी, मार्क्सवादी, पुरोगामी, गांधी वादी संघटन ओर बुद्धिजीवी वर्ग की तरफ़ से लोकतंत्र को ओर लोकतंत्र में स्थित शिक्षा, स्वास्थ्य जैसे अधिकारों को बचाने के लिए हर क्षेत्र से लड़ाई लड़ी जा रहीं हैं। जिसमें प्रोफ़ेसर, शिक्षक/शिक्षिका, डॉक्टर, वकील, मजदूर, लेखक, कलाकार, पत्रकार, अधिकारी कुल मिलाकर निजी ओर सरकारी क्षेत्र में काम करने वाला वर्ग आंदोलन कर रहा हैं, लोकतंत्र को बचाने की कोशिश कर रहा हैं। वैसे में सरकार ओर न्याय व्यवस्था किस के साथ खड़ी हैं, किस तरफ़ अपने कदम बड़ा रही हैं इसके कई उदाहरण हमें देखने को मिल रहे हैं। "NRC , CAA के खिलाफ आंदोलन कर चुके आंदोलनकारियों को हिरासत में लिया जा रहा हैं, तो कहीं पर मजदूरों के हितों के खिलाफ मजदूर कानून में बदलाव किए जा रहे हैं, सरकार के ऑनलाइन शिक्षा के जिद की वजह से कई छात्र/छात्राएं शिक्षा में पिछड़ रहे हैं, जाती को मजबूती देने वाली ऑनार किलिंग जैसी घटनाएं सामने आ रही है, ऑनलाईन शिक्षा के खिलाफ किसी भी तरह की बात की तो वह राष्ट्रहित के विरोध में होगी ऐसा फैसला न्याय व्यवस्था की ओर से सुनाया जा रहा ह...
Comments
Post a Comment