Posts

Showing posts from June, 2018
#मातंग #महार #चांभार #दलित #बुद्ध, #तेली #माळी #कुणबी #मराठा #राजपूत मातंग समाजाच्या नवरदेवाने मंदिरात प्रवेश केल्यामुळे 24 मातंग कुटुंबांना सोडावं लागलं गाव. बाबा साहेबांच्या काळाराम मंदिराच्या प्रवेशा नंतर ही वस्तुस्थिती सर्व बुद्धिजीवीना विचार करायला लावण्याजोगी आहे जाती पाती संपल्या म्हणून पळ काढणारी माणसाची जात जाती टिकवण्यात नेहमीच पुढे असते. हे का ? झालं असं होतं राहणार आहे का ? अजूनही स्वतंत्र भारतात मंदिर प्रवेश, विहिरीत पोहोल्याने पाणी बाटने, कनिष्ठ जाती ने मुछ ठेवल्यास हत्या करणे असे प्रश्न उपस्थित असतील तर माणसाला माणूस म्हणून वागवलं जाणार आहे का ? माणसाचा इतर शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रगती कधी होणार आहे का ? का फक्त वरिष्ठ जातीतील लोकांनीच त्यातही काही वर्गातील लोकांनीच प्रगती करता येणार आहे, समाजात मुप्तपणे वावरता येणार आहे ? इथल्या राजकीय पक्षांना या सर्व गोष्टींकडे पाहणे महत्वाचे वाटते की नाही का यांना जाती धर्म अजून घट्ट करायच्या आहेत आणि त्यावर राजकारण करायचं आहे ? या सर्व गोष्टींचा विचार जातीअंत, वर्गजातीअंत, मानवमुक्तीचा लढा लढणाऱ्या सामाजिक, राजकीय संघट
लोकशाही की हुकूमशाही अलिगढ मध्ये एका शिक्षकाने फेसबुकवर ब्राम्हणवादावर पोस्ट टाकली म्हणून त्या शिक्षकाला पोलिसांच्या समक्ष आमदाराच्या पाया पडून माफी मागावी लागली. गुजरात मधील एका महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी एका प्राध्यापकावर शाही फेकून प्राध्यापकाला मारहाण केली, त्याची मिरवणूक काढण्यात आली. एकीकडे गुरू आणि शिष्याची संस्कृती सांगायची आणि दुसरीकडे शिक्षकाला सत्तेचा माज दाखवत हुकूमशाहीने पाया पडायला भाग पाडायच. प्राध्यापकावर शाई फेकून त्याला मारहाण करणे याला नक्की म्हणावं तरी काय लोकशाही की हुकूमशाही? असा प्रश्न सध्या डोळ्यांसमोर येतो. कारण लोकशाहीला नाकारणारी "हे संविधान आम्हाला मान्य नाही म्हणणारी", "संविधान बदलनेके लिये हम सत्ता मे आये है" बोलणारी यांची विचारधारा जेव्हा संविधानाच्या मार्गाने सत्तेवर येते तेव्हा त्यांच्या कडून फार अपेक्षा करणे मूर्खपणाच ठरत. नुकतच आणीबाणीला ४३ वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने अपेक्षित असल्याप्रमाणे आमचे आदरणीय प्रधानमंत्री यांनी संधीचा फायदा घेत काँग्रेसवर टिकेचा आसूड सोडला. राजकारणाची पोळी