Posts

Showing posts from July, 2018
यूपीच्या छपरा शाळेत एका 9 वर्षाच्या बालिकेवर शिक्षक, मुख्यधापक सहित 15 विद्यार्थी बलात्कार करतात तेव्हा. भारत महिला असुरक्षिततेत पहिल्या क्रमांकावर जेव्हा येतो तेंव्हा देशात होणाऱ्या महिलांवरच्या बलात्काराला कोणत्या एका अंगाने पाहुन भागत नाही पॉर्न व्हिडीओ पाहिल्याने बलात्काराचे प्रमाण वाढत आहे, मुली शॉर्ट घालतात त्यामुळे बलात्काराचे प्रमाण वाढत आहे, संस्कृती लोप पावल्यामुळे बलात्काराचे प्रमाण वाढत आहे अशा अनेक अंगाने पाहून बलात्कारचं विश्लेषण करता येईल का हा प्रश्न कायम आहे. नुकताच यूपी एका शिक्षणाच्या मंदिरात झालेल्या सामूहिक बलात्काराचा आपण विचार केला तर त्यात बलात्काराचा व्हिडीओ काढून ब्लॅकमेल केलं जातं आणि मुख्यध्यापक सहित 18 विध्यार्थ्यांन कढून बलात्कार केला जातो तेव्हा या घटनेत काही विचारवंत प्रवक्ते म्हणतात की "इतक्या दिवस बलात्कार करत असताना त्या बलिकेने घरी अथवा पोलीस ठाण्यात सांगण्याची हिम्मत का केली नाही" तर त्याचा अर्थ त्यांनी कोणत्या अंगाने लावला असेल ते त्यांना आणि त्यांच्या बुद्धिमत्तेला माहीत, परंतु बलात्काराकडे पाहतांना तो बलात्कार वासना क्षमवण्या साठी