Posts

Showing posts from February, 2018
दि. 25 फेब्रुवारी 2018 रोजी आमचे मित्र धीरज यांच्या फेसबुक वॉलवर एक पोस्ट वाचली आणि मन सुन्न झाल. पोस्ट अशी होती- केरळ च्या पलक्कड जिल्यातील आदिवासी भागातील 27 वर्षीय मधू कडूकुमन्ना नावाचा एका व्यक्तीने कित्तेक दिवसापासून भुकेला, त्याच्यावर 100 ते 200 रुपयांचा तांदूळ चोरीचा आरोप लावून त्याला लोकांनी दगड काडीने ठेचून मारून टाकला. वास्तवात यात वाईट वाटण्याजोग, दुःख होण्याजोग आणि मन सुन्न होण्याजोग काहीच नाही कारण असा भुकेन व्याकुळ होऊन चोरीचा आरोप लावून हत्या होणारा मधू हा काही पहिला किंवा एकटा नाही असे लाखो करोडो मधु आपल्याला रोज रेल्वे स्टेशन, बस स्थानक, मार्केट, गावात - शहरात पाहायला भेटतात, आणि थोडा इतिहासाचा आढावा घेतला तर तेव्हापासून ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते फक्त फ़रक इतकाच आहे की पूर्वी तो कायदा होता हत्या करण्याचा गुलामीत मरण्याचा आज त्याला एक प्रोफेशनल नाव आहे भिकारी, चोर.                     मात्र ती गुलामी ती गरिबी आज तागायत तशीच जिवंत आहे भारतात मन की बात सुरू असताना, भारत डिजिटल होत असताना, बुलेट ट्रेन सारखी सुविधा उपलब्ध होत असताना, भारतातील गरिबी संपत असतां